Quantcast
Channel: Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Viewing all 172706 articles
Browse latest View live

'लॉकडाऊन' धुडकावत नमाजासाठी मशिदीत गर्दी

$
0
0
हरदोई, उत्तर प्रदेश : करोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं संपूर्ण देशभर तीन आठवड्यांचा लॉकडाऊन लागू केला आहे. आज या लॉकडाऊनचा तिसरा दिवस... या दरम्यान लोकांनी एकत्र येण्याला आणि गर्दी करण्याला मनाई करण्यात आलेली असतानादेखील अनेक जण ही सूचना धुडकावून लावताना दिसत आहेत. अशाच काही जणांवर उत्तर प्रदेशात कारवाई करण्यात आलीय. उत्तर प्रदेशातील हरदोई आणि बहराइच जिल्ह्यांत मशिदीत नमाज अदा करण्यासाठी लोकांना गोळा करणाऱ्या तीन इमामांसहीत ६० जणांवर करण्यात आलाय. बहराइचचे पोलीस अधीक्षक विपिन मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमाम इमरान खान इतर २० जणांसहीत आझादनगरच्या एका मशिदीत गोळा झाले होते. आदेश झुगारत इमामासहीत या सर्वांनी गर्दीत नमाज अदा केला. उत्तर प्रदेशातील हेल्पलाईन क्रमांक ११२ या क्रमांकाद्वारे याची माहिती पोलिसांपर्यंत पोहचली... आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत देशव्यापी लॉकडाऊन धुडकावून गोळा होणाऱ्या आणि स्वत:सहीत इतरांचाही जीव धोक्यात घालणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. काझी इमरान खान यांनी नमाज अदा करण्यासाठी आपल्याला मशिदीत बोलावल्याचं एकत्र जमलेल्या लोकांनी पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी इमरान खान आणि इतर २० जणांविरोधात एफआयआर दाखल केली. याचप्रमाणे हरदोई जिल्ह्यात दोन आणखी गुन्हे दाखल करण्यात आल्यात. हरदोईच्या संडीला भागात इमाम मोहम्मद आसिफ आणि इतर २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर कोतवाली पोलिसांनी इमाम अली अहमद आणि इतर २० जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. यानंतर पोलिसांनी मुस्लीम समुदायाच्या सर्व इमामांना आणि धार्मिक प्रमुखांना न करता आपल्या घरातच नमाज अदा करण्याची विनंती केलीय.

राज्यातील निम्मे करोनाग्रस्त ३१ ते ५० वयोगटातील

$
0
0
मुंबई: देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील निम्मे करोनाग्रस्त ३१ ते ५० वयोगटातील असून त्यातही ३१ ते ४० वयोगटातील करोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचं एका अभ्यासातून आढळून आलं आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाच्या एका अभ्यासातून हे दिसून आलं आहे. या विभागाने महाराष्ट्रातील एकूण १२२ करोनाग्रस्तांची माहिती घेतली असता त्यातूनच हा आकडा पुढे आला आहे. या अभ्यासानुसार १२२ रुग्णांपैकी ३३ रुग्ण हे ३१ ते ४० वयोगटातील आहेत. तर २१ ते ३० आणि ४१ ते ५० वयोगटातील रुग्णांची संख्या प्रत्येकी २४ आहे. तसेच ५१ ते ८० वयोगटातील रुग्णांची संख्या ३१ आणि १ ते २० वयोगटातील रुग्णांची संख्या १० असल्याचं आढळून आलं आहे. या अभ्यासानुसार राज्यात आढळून आलेले सर्वाधिक करोना रुग्ण हे परदेशातून आलेले आहेत. या करोना रुग्णांची संख्या ५० टक्के आहे. या शिवाय राज्यात करोनांची लागण झालेल्यांमध्ये ६९ टक्के पुरुष आणि ३१ टक्के महिला आहेत. तर कोणत्या ना कोणत्या देशात जावून आलेले रुग्ण ५४ टक्के आहेत.

दरम्यान, भारतातील करोनाचा साप्ताहिक ग्राफ पाहता आपण सध्या अंतिम टप्प्यावर आहोत. करोनाचाहा आपल्या देशातील ८वा आठवडा आहे. या आठ आठवड्यात आपल्याकडे केवळ ६०० रुग्ण आढळून आले आहेत. त्या तुलनेत इतर देशांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले होते, असं राज्याच्या आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
राज्यात आतापर्यंत कम्युनिटी संसर्ग झालेला नाही. ही चांगली गोष्ट असली तरी सरकारने तपासणी व्यवस्थेत वाढ करायला हवी. लोकांना ताटकळत राहावे लागणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी, असं तज्ज्ञांनी सांगितलं. दरम्यान, मुंबई पालिकेने करोना रुग्णांसाठी हेल्पलाइन सुरू केली आहे. तसेच घरोघरी जाऊन संशयितांचे सँपल घेण्याची व्यवस्थाही पालिकेने केली आहे. मात्र, या चाचणीसाठी संशयितांना ४५०० रुपये मोजाववे लागणार आहेत.

'करोना'ग्रस्तांचे खोटे आकडे व्हायरल केले; तिघांना अटक

$
0
0
नागपूर: नागपुरातील करोनाग्रस्त रुग्णांच्या आकड्यांबाबत फेक ऑडिओ क्लिप तयार करून व्हायरल करणाऱ्या तीन जणांना सायबर क्राईम सेलने अटक केली आहे. जय गुप्ता, अमित पारधी आणि दिव्यांशू मिश्रा अशी या आरोपींची नावे आहेत. राज्यात 'करोना'चा फैलाव दिवसागणिक वाढत असून रुग्णांची संख्या १३० वर पोहोचली आहे. तर, चार जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानं नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. या परिस्थितीचा फायदा उठवून काही समाजकंटक अफवा पसरवत आहेत. नागपूरमध्ये अशाच प्रकारे करोनाग्रस्तांचा चुकीचा आकडा व्हायरल करणारे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. या तिघांनी मिळून एक फेक ऑडिओ तयार केला. त्यात गुप्ता आणि पारधी यांचं दोघांचं संभाषण असून त्यात ते नागपूरमध्ये ५९ रुग्ण सापडल्याचा दावा करत आहेत. दिव्यांशू मिश्रा यानं त्याच्या बायकोला पाठविलं आणि पुढे ते व्हायरल झालं, अशी प्राथमिक माहिती आहे. सायबर सेलनं तात्काळ चौकशी करून हे प्रकरण उघडकीस आणलं. सायबर पोलिसांनी उघडकीस आणलेलं हे पहिलंच प्रकरण असल्याचं बोललं जात आहे. तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली. वाचा:

Corona Live: कर्नाटकात एका रुग्णाचा मृत्यू

$
0
0
देशभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. काल रात्री उशिरापर्यंत देशात एका दिवसात ४२ नवे रुग्ण आढळले. तर, कालच्याच दिवसात करोनामुळे ४ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील विविध राज्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासनालाही एकीकडे कडक कारवाई करावी लागत आहे, तर दुसरीकडे घरीच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पाहुयात, देशभरात करोना संसर्गाची काय स्थिती आहे. Live अपडेट्स... >> कर्नाटकात एकाचा करोनामुळे मृत्यू, कर्नाटकात मृतांची संख्या ३ >> दिल्लीत करोनाग्रस्तांची संख्या ३९ वर- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची माहिती. >> राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी करोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यांमधील राज्यपालांशी केली चर्चा. >> (सविस्तर बातमी वाचण्यासाठी करा क्लिक) >> पश्चिम बंगाल: कोलकात्यातील रस्त्यांवर लॉकडाऊनच्या तिसऱ्या दिवशी असा शुकशुकाट आहे. >> दिल्लीत आतापर्यंत ३६ जणांना करोनाची लागण, एक मृत्यू >> पंजाबमधील पोलिस कर्मचारी लोकांना गमतीशीर पद्धतीने आवाहन करताना... >> भारतात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७०० वर, तर आतापर्यंत २० जणांचा मृत्यू >> महाराष्ट्रात धान्याची दुकाने २४ तास खुली राहणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय. >> दिल्लीत एकूण ९०० जणांना क्वारंटाइन केले जाणार. >> करोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. >> काल २४ तासांमध्ये आढळले एकूण ४२ रुग्ण >> देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ६९४ वर पोहोचली आहे.

पोलीसालाच मारहाण; क्रिकेटपटू भडकला!

$
0
0
नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याचे सांगितले आहे. देशातील बहुतांश जनता घरीच थांबली आहे. पण काही जण मात्र लॉकडाऊनचे पालन करत नाहीत. अशा लोकांना भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने फटकारले. वाचा- करोना व्हायरसची लागण रोखण्यासाठी पुढील काही दिवस अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळेच लॉकडाऊन यशस्वी होणे आवश्यक आहे. यासंदर्भात देशाच्या पंतप्रधानांपासून ते सिनेस्टार आणि खेळाडू वारंवार आवाहन करत असताना देखील काही जण रस्त्यावरून फिरत आहे. अशा लोकांवर पोलिस कारवाई करत आहे. वाचा- हरभजनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत काही लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. जेव्हा या लोकांना पोलिस रोखतात आणि घरी जाण्याचा सल्ला देतात तेव्हा ते पोलिसांसोबत वाद घालतात. यावर हरभजन म्हणतो, पोलिसांच्या बद्दलची आपला व्यवहार बदलण्याची गरज आहे. आपल्या सुरक्षेसाठी ते स्वत: चे आयुष्यपणाला लावून दिवस रात्र रस्त्यावर फिरत आहे. या व्हिडिओत, पोलिसांना काही जण मिळून मारहाण करताना दिसत आहेत. या घटनेवर हरभजन चांगलाच भडकला आहे. करोना व्हायरसने आतापर्यंत २१ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या ४ लाखांवर पोहोचली आहे. भारतात देखील करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. जे लोक लॉकडाऊन न पाळता घरातून बाहेर येत आहेत. त्यांच्यावर पोलिस कारवाई करत आहेत. केंद्रीय आरोग्य कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत करोना व्हायरसमुळे १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर करोनाची लागण झालेल्यांची संख्या ७००वर पोहोचली आहे.

कर्ज फेडीस ३ महिने मुदतवाढ : नेमका अर्थ काय ?

$
0
0
मुंबई : रिझर्व्ह बँकेने आज कर्जदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर 'आरबीआय'ने कर्जदारांना तीन महिने हप्ते फेडण्यासाठी मुदतवाढ द्यावी, असे आवाहन सर्व बँकांना केले आहे. अर्थात या तीन महिन्यांच्या स्थगन कालावधीत (3 month moratorium) बँकांनी कर्जदारांच्या खात्यातून परस्पर कर्जाचा मासिक हप्ता (EMI) कापू नये, असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत बँकांनी कर्जफेडीचा कालावधी वाढवल्यास मुदतीची कर्जे घेतलेल्या (Term loan ) कर्जदारांना दिलासा मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या आजच्या घोषणेनुसार कर्जदारांना कर्जफेडीसाठी तीन महिने अतिरिक्त कालावधी देण्याचे आवाहन '' ने बँकांना केले आहे. यामुळे उशिराने कर्जाचे हप्ते भारणाऱ्या ग्राहकांना कोणतेही व्याज किंवा दंडात्मक शुल्क भरावे लागणार नाही. तसेच कर्जफेड चुकल्याने होणारे कर्ज खात्याचे वर्गीकरण बँकांना करता येणार नाही. ग्राहकाचा क्रेडीट स्कोर खराब होऊ नये, याचीही खबरदारी बँकांना घ्यावी लागणार आहे. ही सुविधा केवळ मुदतीची कर्जे घेतलेल्या (Term loan ) कर्जदारांसाठी असून क्रेडीट कार्ड धारकांसाठी नाही. १ मार्च २०२० पर्यंत ज्यांची कर्जफेड बाकी आहे, अशा ग्राहकांना मासिक हप्ता (EMI) भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात येईल. कर्जदारांना EMI भरण्यासाठी अतिरिक्त मुदत देण्यास रिझर्व्ह बँकेने बँकांना परवानगी दिली आहे. यात सर्व वाणिज्य बँका, लघु वित्त बँका, सहकारी बँका, बिगर बँकिंग वित्त संस्था, ग्रामीण बँका यांना ही सुविधा कर्जदारांना उपलब्ध करता येईल. यासाठी कर्जदारांचे तीन महिन्यांचे हप्ते , त्यांचा परतफेडीचा नवा कालावधी तसेच त्यांची मुदत याची फेररचना बँकांना करावी लागेल, असे 'आरबीआय'ने स्पष्ट केले आहे. या तीन महिन्यांच्या स्थगन कालावधीत (3 month moratorium) बँकांनी कर्जदारांच्या खात्यातून परस्पर कर्जाचा मासिक हप्ता (EMI) कापू नये, असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. रिझर्व्ह बँकेची आजची घोषणा सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठी दिलासा देणारी आहे. तीन महिने कर्जफेडीसाठी मुदतवाढ दिल्याने किरकोळ कर्जदारांचा होणारा डिफॉल्ट आणि त्यातून वाढणारी बुडीत कर्जे तूर्त थांबवण्याच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय योग्य आहे. आता बँकांनी याची काटेकोर अंलबजावणी केल्यास ग्राहकांना थेट फायदा मिळेल, असे एडलवाइज समूहाच्या अर्थतज्ज्ञ माधवी अरोरा यांनी सांगितले. करोनाच्या संकटकाळात आजच्या रिझर्व्ह बँकेच्या उपायोजना अत्यावश्यक होत्या. बँकेने रेपो दर थेट ०.७५ टक्के कमी करणे, तीन महिने कर्जफेडीला मुदतवाढ देण्याचे बँकांना आवाहन करणे आणि बाजारातील रोखता वाढवणासाठी घेतलेले निर्णय अभिनंदनास पात्र आहेत. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य विश्लेषक डॉ. व्ही. के विजयकुमार यांनी सांगितले.

फोटोः घराबाहेर पडताच सुनील ग्रोवर पडला मार

$
0
0
मुंबई- जागतिक महामारी व्हायरसशी लढण्यासाठी प्रत्येक देश शर्थीचे प्रयत्न करत आहेत. देशाला नागरिकांची जेवढी साथ मिळेल तेवढ्या लवकर या संकटातून आपण बाहेर येऊ शकतो. करोना विषाणूचा संसर्ग जास्त लोकांना होऊ नये म्हणून केंद्र सरकाने २१ दिवसांचं लॉकडाउन घोषित केलं. या २१ दिवसांमध्ये प्रत्येक व्यक्तीला घरात राहणं बंधनकारक आहे. यामुळेच सेलिब्रिटींपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सारेच जनतेला जास्तीत जास्त घरी राहण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून लोकांना सुरक्षित राहण्यास सांगत आहेत. अभिनेता सुनील ग्रोवरनेही आपल्या अनोख्या अंदाजात एक खास मेसेज त्याच्या चाहत्यांना दिला आहे. सुनीलने स्वतःचं एक मीम सोशल मीडियावर शेअर केलं. यात सुनील ग्रोवर लांब केसांमध्ये पोलिसांकडून फटके खाताना दिसत आहे. या मीमच्या माध्यमातून सुनीलने करोनाचं गांभीर्य समजून घरातून न निघण्याचा सल्ला दिला आहे. जर कोणी आगाऊपणा केलाच तर त्याला पोलीस पकडू शकतात असंही या मीममधून सुचवण्यात आलं आहे. हे मीम शेअर करताना सुनीलने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'कृपा करून घरी रहा.' सध्या सुनीलची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सुनील ग्रोवर आधी अभिनेता कार्तिक आर्यननेही एक मीम शेअर केलं होतं. हेरा फेरी सिनेमातील एका सीनवर मीम तयार करण्यात आलं होतं. फोटोत अक्षयऐवजी कार्तिकचा चेहरा लावण्यात आला होता आणि त्यावर 'मोदीजी ही लोकं असं नाही ऐकणार.. त्यांना २१ दिवसांमध्ये पैसे दुप्पट हे ऐकायचं आहे.' चाहत्यांनी या मीमवर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या होत्या.

आधी देशाचा विचार करू; IPLचे नंतर बघू!

$
0
0
मुंबई: स्पर्धा नंतर देखील होऊ शकते. आता लोकांचा जीव महत्त्वाचा आहे, असे भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे. देशात करोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनला रोहितने पाठिंबा देत लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण देशाने याआधी कधीच न अनुभवलेल्या परिस्थितीतून जात आहे. सर्व सामान्य जनतेपासून ते खेळाडू घरीच थांबले आहेत. क्रिकेटसह अन्य खेळातील खेळाडू घरीच थांबून लोकांना सोशल मीडियावरून आवाहन करत आहेत. यात भारताचा कर्णधार विराट कोहली, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवागसह अन्य खेळाडूंचा समावेश आहे. वाचा- बीसीसीआयने देखील करोनाचा धोका लक्षात घेऊन आयपीएलसह सर्व स्पर्धा स्थगित केल्या आहेत. यासंदर्भात बोलताना रोहितने वाट पाहू शकते पण सध्या या संकटापासून वाचणे अधिक गरजेचे असल्याचे म्हटले आहे. वाचा- भारताचा फिरकीपटू यजुवेंद्र चहल सोबत इस्टाग्रामवर बोलताना रोहितने आयपीएलच्या आयोजनापेक्षा करोनाचा धोका मोठा असल्याचे सांगितले. आपल्या सर्वांना आधी देशाचा विचार केला पाहिजे. सध्या जी परिस्थिती आहे त्यात सुधारणा झाल्याशिवाय आपण आयपीएलवर बोलू शकत नाही. आधी आपले आयुष्य सामान्य होऊ दे, असे रोहित म्हणाला. वाचा- संपूर्ण देशात मुंबईसारखी परिस्थिती आहे. मी याआधी मुंबईला अशा परिस्थितीत कधीच पाहिले नाही, असे रोहितने सांगितले. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत जखमी झाला होता. त्यानंतर तो मैदानापासून दूर झाला. रोहित शिवाय वनडे आणि कसोटी मालिकेत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

क्लिनिक सुरू ठेवा; टोपे यांची खासगी डॉक्टरांना सूचना

$
0
0
मुंबई: राज्यातील करोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतच असून आज त्यात पाच जणांची भर पडली आहे. करोना रुग्णांचा आकडा आता १३५ झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री यांनी आज दिली. तसंच, खासगी डॉक्टरांनी आपल्या क्लिनिक सुरू ठेवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी आज जनतेशी संवाद साधला. करोनामुळं निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. 'आतापर्यंत ४२२८ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी ४०१७ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. आता ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट या 'तीन टी'वर भर देण्यात आला आहे. १९ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. डिस्चार्जचा हा आकडा हळूहळू वाढत जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 'राज्यातील अनेक भागांत डॉक्टरांनी भीतीपोटी आपली क्लिनिक बंद ठेवली आहेत. संकटाच्या काळात वैद्यकीय व्यवसायातील लोकांनी असं करणं योग्य नाही. करोनाच्या व्यतिरिक्तही अनेक आजार असतात, ज्यामुळं लोक त्रस्त असतात. त्यांना उपचारांची गरज लागते. त्यांची ससेहोलपट होता कामा नये. डॉक्टरांनी कुणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. त्यांना पुरेसं संरक्षण दिलं जाईल. जिल्ह्यातील सर्व पोलीस प्रमुखांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत,' असं टोपे यांनी यावेळी सांगितलं. आरोग्यमंत्र्यांच्या सूचना > राज्यात सध्या फक्त सात ते आठ दिवसाचं रक्त शिल्लक आहे. रक्तदान करा > आरोग्य कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देणार > आरोग्य कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देणार, प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा विचार > शेती व्यवसाय सुरू राहिलाच पाहिजे, शेतीमाल बाजारपेठेत आला पाहिजे, प्रशासनाने मदत करावी > रक्तदान शिबिरांसाठी सर्व प्रकारचं सहकार्य करण्याच्या पोलिसांना सूचना

व्हिडिओ: वहिनीसाहेबांचा किनचमध्ये जीव रंगला

$
0
0
मुंबई: करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सध्या जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. देशातही रुग्णांचा आकडा वाढतो आहे. संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारद्वारे २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान शुटिंग रद्द असल्यानं सिनेसृष्टीतील मोठे सेलिब्रिटी देखील घरी बसून आहेत. ते स्वतः तर घरी राहतच आहेत शिवाय चाहत्यांनाही घरात बसण्याचा सल्ला ते वेळोवेळी देत आहेत. एवढंच नाही तर त्यांच्या घरी कामाला येणाऱ्यांनाही त्यांनी घरी बसण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळंच सध्या सेलिब्रिटी मंडळी घरातली कामं करताना दिसत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सध्या त्यांचा हा वेळ सत्कारणी लावत आहेत. अभिनेत्री ही देखील या वेळेचा पुरेपूर वापर करत आहे. कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. घरातली कामं शिकून घेत आहे. आरोग्याकडं लक्ष देत आहे. व्यायम करत आहे. विशेष म्हणजे धनश्री स्वयंपाक घरात जास्त दिसून येतेय. नव नवीन पदार्थ शिकते. इन्स्टाग्रामवर तिनं अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. एका व्हिडिओत ती भाकरी बनवताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओंना चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद दिला आहे. याशिवाय अभिनेत्री रिंकू राजगुरू हिनं देखील लाकडाऊन दरम्यान आईला घरकामात मदत करायला सुरुवात केली आहे. तिनं इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे त्यात ती चपात्या करताना दिसतेय. 'घरी राहा, सुरक्षित राहा. आईला घर कामात मदत करा, पुस्तके वाचा, चित्रपट बघा, चित्रे काढा, व्यायाम करा. काळजी घ्या’ असं तिनं व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

अंडी, कोंबडी, मटण विक्रीला परवानगी: अजित पवार

$
0
0
मुंबई: जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरू ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहोचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि ‘करोना’ सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री यांनी आज दिली. राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे नागरिकांना हे पदार्थ खरेदी करता येतील. कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. मात्र, विक्री आणि खरेदी करणाऱ्या दोघांनीही ‘करोना’संदर्भात आवश्यक स्वच्छता, सुरक्षितता बाळगायची आहे. गर्दी व त्यामुळं होणारा संसर्ग टाळून खरेदी करायची आहे, असंही पवार यांनी सांगितलं. वाचा:

वाचा:

राज्यातील शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी थांबलेली नाही. शेतकरी बायोमेट्रीकसाठी तयार नाहीत आणि शासकीय यंत्रणा करोना प्रतिबंधासाठी व्यग्र असल्याने यात काहीसा संथपणा आल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. दूध, भाजीपाला, फळांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना इंधनाचा पुरवठा करण्यात कोणताही अडथळा नाही. साखर कारखान्यात गाळपासाठी ऊस आणण्यास परवानगी आहे. मात्र उसतोड मजुरांच्या जेवणाची काळजी संबंधित कारखान्यांना घ्यावी लागणार आहे. राज्य सरकारने लष्कराच्या मदतीसाठी लिहिलेले पत्र हे केवळ वैद्यकीय मदत मिळण्यापुरते मर्यादित असल्याचा खुलासाही उपमुख्यमंत्र्यांनी केला. वाचा:

करोनाविरुद्धच्या लढ्यात सचिनकडून मोठी मदत!

$
0
0
मुंबई: करोना व्हायरसविरुद्ध लढ्यात भारताचा दिग्गज क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मोठी रक्कम दिली आहे. करोनामुळे देशात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारे युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडू पुढे येत आहेत. वाचा- सचिन तेंडुलकरने करोनाविरुद्धच्या लढ्यात ५० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. करोनाविरुद्धच्या लढ्यात आतापर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूने दिलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सचिन तेंडुलकरने पंतप्रधान मदत निधीला आणि मुख्यमंत्री मदत निधीला प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याचा ठरवले आहे. हा निधी करोना व्हायरसविरुद्ध लढ्यात वापरला जाणार आहे. करोना विरुद्धच्या लढ्यात सचिनला राज्य आणि केंद्र दोघांना मदत करायची होती म्हणून त्याने असा निर्णय घेतला. वाचा- सामाजिक कार्य आणि मदत निधीच सचिनचा नेहमी पुढाकार असतो. पण दरवेळी सचिन त्याबद्दलचा तपशील नेहमीच जाहीर करत नाही. सचिनच्या आधी भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही. सिंधूने १० लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. इरफान आणि युसूफ पठाण यांनी ४ हजार मास्क दिले होते. तर धोनीने पुण्याच्या एका संस्थेला एक लाख रुपयांची मदत केली होती. वाचा- भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया, धावपटू हिमा दास यांनी देखील अशाच प्रकारची मदत जाहीर केली आहे. वाचा- धोनीने पुण्यातील १०० कुटुंबीयांच्या अन्न-धान्याची घेतली जबाबदारी! पुण्यात ज्यांचा रोजगार गेला आहे त्यांच्यासाठी धोनीने एका संस्थेला १ लाख रुपयांची मदत केली आहे. अनेक खेळाडू करोना संदर्भात राज्य सरकारांना मदतीचा हात पुढे करत आहेत. पण धोनीने थेट पुण्यातील एका संस्थेला मदत केली आहे. ही संस्था रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांसाठी काम करते.

नुसता सल्ला देऊन बँका ऐकणार नाहीत: पवार

$
0
0
मुंबई: ‘करोना’ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्हं बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केलेल्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्था सावरण्यास काही अंशी मदत होणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी निर्णयांचे स्वागत केले आहे. मात्र, देशातील बँका व वित्तीय संस्थांनी कर्जवसुली तीन महिन्यांसाठी स्थगित करावी, असा केवळ सल्ला देऊन या बँका ऐकणार नाहीत. त्यांना रिझर्ब्ह बँकेकडून स्पष्ट निर्देश जाणे अपेक्षित आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. ‘करोना’संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले देशव्यापी ‘लॉकडाऊन’ आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता रिझर्व्हं बँकेकडून हे निर्णय अपेक्षित होते. रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात केल्याने कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होईल. बँकांचा सीआरआर कमी करून ३ टक्क्यांवर आणल्याने बाजारात पावणे चार लाख कोटी रूपये उपलब्ध होतील, याचा बँकांना फायदा होईल. परंतु, राष्ट्रीय, खासगी, सहकारी बँका व अन्य वित्तीय संस्थांनी त्यांची कर्जवसुली तीन महिने थांबवण्यासाठी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने या संस्थांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी वित्तमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

वाचा:

करोना-'त्यांनी वटवाघूळ खाण्याची शिक्षा जगाला'

$
0
0
मुंबई- चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या विषाणूने संपूर्ण जगात भयानक रूप धारण केल्याचे चित्र आहे. जीवावर बेतणाऱ्या हा करोना विषाणू सुमारे १९८ देशांमध्ये फैलावला आहे. करोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जवळपास ५० हून अधिक देशांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही २१ दिवसांसाठी देशात लॉकडाउन घोषित केलं. नुकतंच बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीने यासंबंधी ट्ववीट केलं. त्याच्या या ट्वीटमध्ये चीनबद्दलचा राग स्पष्ट दिसत होता. आपल्या या ट्वीटमध्ये इम्रानने लिहिले की, '..आणि हे सगळं यासाठी होतंय कारण इथपासून हजारो किमी दूर काही लोकांना वटवाघूळला खायचं होतं.' सध्या इम्रानचं हे ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इम्रान हाश्मी शेवटचं द बॉडी या सिनेमात काम केलं होतं. येत्या काळात तो नवीन प्रोजेक्टमध्येही दिसणार आहे. करोना व्हायरसमुळे पूर्ण देश लॉकडाउनमध्ये आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत १३० जणांना करोनाची लागण झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत १८जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून त्यात एका तीन वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. तर आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात आतापर्यंत ७२४ लोकांना करोनाचा संसर्ग झाला असून आतापर्यंत १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर यां पैकी ६६ करोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. जगभरात करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ही पाच लाखांहून अधिक झाली आहे. तर, मृतांचा आकडा वाढला असून २२ हजारहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यूंचे प्रमाण हे इटलीत नोंदवण्यात आले असून दुसऱ्या स्थानावर स्पेनचा क्रमांक आहे.

लष्कर आता 'युद्धा'साठी तयार; करोनाविरुद्ध 'ऑपरेशन नमस्ते'

$
0
0
नवी दिल्ली: देशावर जेव्हा-जेव्हा संकट आले, तेव्हा तेव्हा भारतीय लष्कराने पुढे येत प्रभावी भूमिका अदा केली आहे. लष्कराच्या परंपरेनुसार आताही देशावर करोनासारख्या जागतिक साथीच्या आजाराचे संकट आले असताना, पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय लष्कराने ऑपरेशन सुरू करत करोनाविरुद्ध युद्ध छेडले आहे. पराक्रम अभियानाप्रमाणेत तयार आहे लष्कर सर्व लष्करी अधिकारी आणि जवानांच्या सुट्ट्यांवर बंदी घालण्यात आली असून अशाच प्रकारे सन २००१ मध्ये पराक्रम अभियानाच्या वेळी ८ ते १० महिन्यांच्या कालावधीत कुणालाही सुट्टी देण्यात आलेली नव्हती, अशी माहिती भारताचे मनोज मुकुंद नरवणे यांनी दिली. पराक्रम अभियानावेळी देखील आम्हाला विजय मिळाला होता. आता नमस्ते अभियानदेखील यशस्वी होणार असा ठाम विश्वासही लष्करप्रमुखांनी व्यक्त केला. भारतीय लष्कराची संस्थात्मक रचना आणि प्रशिक्षणाच्या बळावर अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करणे शक्य होते, असेही नरवणे म्हणाले. कोविड-१९ शी लढताना आम्ही याच क्षमतांचा वापर करू असे ते म्हणाले. करोना विषाणूशी सुरू झालेल्या लढाईत सरकार आणि सामान्य प्रशानाला मदत करणे ही आमची जबाबदारी आहे असेही लष्करप्रमुख म्हणाले. एक लष्करप्रमुख या नात्याने सैन्यदलाला फीट ठेवणे माझी जबाबदारी आहे. देशाच्या रक्षणासाठी आम्हाला स्वत:ला सुरक्षित आणि फीट राखणे अत्यंत महत्वाचे आहे. हेच लक्षात घेत आम्ही गेल्या काही आठवड्यांमध्ये एका आठवड्यात २-३ अॅडव्हाझरी जारी केली आहे, असेही ते पुढे म्हणाले. करोनाविरुद्ध 'नमस्ते अभियान' मागील सर्व अभियानांमध्ये लष्कराला यश मिळाले होते आणि आता या नमस्ते अभियानामध्येही आम्ही नक्कीच यशस्वी होऊ, असे नरवणे म्हणाले. लष्कराने देशभरात ८ क्वारंटाइन सेंटर्स उभारले आहेत. तसेच लष्कराने हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. यासाठी लष्कराने सदर्न कमांड, ईस्टर्न कमांड, वेस्टर्न कमांड, सेंट्रल कंमांड, नॉर्दन कमांड, साऊथ वेस्टर्न कमांड आणि दिल्ली मुख्यालयात करोना हेल्पलाइन सेंटर्स उभारण्यात आले आहेत. या सेंटर्सच्या माध्यमातून करोनाची लागण झालेल्या नागरिकांना मदत पुरवली जाणार आहे. या बरोबरच, या संकटाचा सामना कसा करावा, याची माहितीही सर्वसामान्य नागरिकांना दिली जाणार आहे.

५१ चेंडूत ८२; ICC ने शेअर केला मास्टर क्लास!

$
0
0
मुंबई: ऑस्ट्रेलियात यंदा स्पर्धा होणार आहे. करोना व्हायरसचा धोका या स्पर्धाला सुद्धा आहे. सध्याच्या परिस्थितीत आयसीसीने पात्रता फेरीतील सर्व सामना स्थगित केले आहे. करोना रुग्णांची संख्या कमी झाली तर ही स्पर्धा नियोजित वेळेत होईल असे आयसीसीने म्हटले आहे. अन्य खेळांप्रमाणे क्रिकेट विश्वात शांतता असली तरी आयसीसी सोशल मीडियावर चाहत्यांसाठी सक्रीय आहे. आयसीसीने गेल्या म्हणजे २०१६ साली झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमधील विराट कोहलीच्या धमाकेदार खेळीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. वाचा- आजच्या दिवशी म्हणजेच २०१६ मध्ये विराट कोहलीने टी-२० मधील सर्वात शानदार अशी खेळी केली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमीफायनलमध्ये जाण्यासाठीची ही लढत होती. मोहालीच्या पीसीए स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ६ बाद १६० धावा केल्या होत्या. वाचा- भारताची सुरुवात फार वेगाने झाली नाही. शिखर धवन आणि रोहित शर्मा हे लवकर बाद झाले. भारताची अवस्था ७.५ षटकात ३ बाद ४९ अशी होती. तेव्हा भारताची आशा फक्त एका खेळाडूवर होती तो म्हणजे होय. वाचा- विराटने युवराज सिंग सोबत चौथ्या विकेटसाठी ४५ धावांची भागिदारी केली. युवी बाद झाला तेव्हा भारताला ६ षटकात ६६ धावांची गरज होती. याचा अर्थ भारताला प्रत्येक षटकात ११ धावांची गरज होती. मोहालीच्या या खेळपट्टीवर ही सोपी गोष्ट नव्हती. वाचा- कोहली सोबत मैदानावर महेंद्र सिंह धोनी होता. या कर्णधार आणि उपकर्णधार जोडीने चौकार-षटकाराच्या ऐवजी वेगाने धावा घेत धावफलक पुढे नेला. अखेरच्या ३ षटकात भारताला ३९ धावा हव्या होत्या. वाचा- ऑस्ट्रेलियाकडून जेम्स फॉकनरने १८वे षटक टाकले. विराटने फॉकनरच्या या षटकात १९ धावा केल्या. अखेरच्या २ षटकात २० धावांची गरज असताना विराटने कमाल केली आणि भारताला सेमीफायनलमध्ये जागा मिळवून दिली. सामन्यात विराटने ५१ चेंडूत ८२ धावा केल्या.

करोना: शिंकल्याने लाखोंच्या वस्तू फेकल्या!

$
0
0
हॅनोवर (पेन्सिलवेनिया): करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जगभरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अनेकजण करोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी काळजी घेत आहेत. अमेरिकेतही करोनाचा संसर्ग वाढत असल्याने भीतीचे वातावरण आहे. पेन्सिलवेनियातील एका सुपरमार्केटमध्ये एक महिला खोकल्यानंतर लाखो रुपयांच्या वस्तू फेकून दिल्यात. गॅरिटेज सुपरमार्केटचे मालक जोई फासुला यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी एक महिला सुपरमार्केट स्टोरमध्ये आली. त्यानंतर तिने काही वस्तूंवर शिंकण्यास आणि खोकण्यास सुरुवात केली. आम्हाला वाटले ही महिला प्रँक करत असेल. मात्र, कोणतीच जोखीम नको म्हणून नाईलाजास्तव त्या वस्तू फेकून द्याव्या लागले असल्याचे सुपरमार्केट मालकाने फेसबुक पोस्टवर सांगितले. या फेकून दिलेल्या वस्तूंची किंमत ३५ हजार डॉलर होती. भारतीय रुपयांमध्ये याची किंमत २६ लाखांहून अधिक आहे. या महिलेने जाणूनबुजून असा प्रकार केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. या महिलेची वैद्यकीय तपासणीही करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाचा: दरम्यान, जागतिक महासत्ता असणारी अमेरिका करोनाचा संसर्गाचे नवे केंद्र झाले असल्याचे समोर आले आहे. जगातील सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण अमेरिकेत झाले असून चीन, इटलीलाही मागे टाकले आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्यानंतरही अमेरिकेत करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. गुरुवारी एकाच दिवसात अमेरिकेत १७ हजार करोनाबाधित रुग्ण आढळले. अमेरिकेत आतापर्यंत ८३ हजार ५०० करोनाबाधित आढळले आहेत. आणखी वाचा:

सांगलीत करोनाचे १२ नवे रुग्ण; एकाच कुटुंबातील २३ बाधीत

$
0
0
सांगली: सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरात करोनाचे १२ नवीन रुग्ण आढळले असून जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या २३ तर राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता १४७ वर पोहचली आहे. गंभीर बाब म्हणजे इस्लामपुरात आढळलेले करोनाचे सर्व रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. कुटुंबातील आधीच्या करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने या सर्वांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे सांगलीत करोना रुग्णांची संख्या २३ पर्यंत गेल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. आरोग्य यंत्रणाही हादरून गेली आहे.

World Live: स्पेनमध्ये एकाच दिवसात ७१८ बळी

$
0
0
रोम: जगभरात वेगाने फैलावत आहे. सुमारे १८० हून अधिक देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला असून दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ही पाच लाखाहून अधिक झाली आहे. तर, मृतांचा आकडा वाढला असून २२ हजारहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यूंचे प्रमाण हे इटलीत नोंदवण्यात आले असून दुसऱ्या स्थानावर स्पेनचा क्रमांक आहे. जाणून घेऊयात करोनाबाबतच्या लाइव्ह अपडेट्स: लाइव्ह अपडेट्स : > कॅनडात ३९ जणांचा मृत्यू > करोनाबाधितांची संख्या ५ लाखांहून अधिक झाली. > तुर्कीमध्ये करोनाच्या संसर्गामुळे ७५ जणांचा मृत्यू > वाचा: > इटलीत मृत्यूचे थैमान सुरूच; एकाच दिवसांत ६६२ जणांचा मृत्यू > स्पेनमध्ये मृतांचा आकडा वाढला; मृतांची संख्या ४१४५ वर > अमेरिकेत करोनामुळे १०८० जणांचा मृत्यू > इराणमध्ये एकाच दिवसांत १५७ जणांचा मृत्यू; एकूण २२३४ जणांचा मृत्यू > दक्षिण कोरियात करोनामुळे १३१ जणांचा मृत्यू > नेदरलँड्समध्ये करोनाच्या संसर्गामुळे ४३४ जणांचा मृत्यू > ऑस्ट्रियात ४२ जणांचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू > जगभरात मृतांचा आकडा २२ हजार १५६ वर पोहचला

करोना Live: केंद्रीय स्तरावर टास्क फोर्सची निर्मिती

$
0
0
देशभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. काल रात्री उशिरापर्यंत देशात एका दिवसात ४२ नवे रुग्ण आढळले. तर, कालच्याच दिवसात करोनामुळे ४ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील विविध राज्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासनालाही एकीकडे कडक कारवाई करावी लागत आहे, तर दुसरीकडे घरीच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पाहुयात, देशभरात करोना संसर्गाची काय स्थिती आहे. Live अपडेट्स... >> भारत इलेक्ट्रिक्स लिमिटेड आणि इतर शासकीय कंपन्यांना व्हेंटिलेटर्स खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत- लव अग्रवाल. >> देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मजुरांवर लक्ष द्यावे- केंद्राच्या सूचना >> ३० हजार अतिरिक्त व्हेंटिलेटर खरेदी करण्याचे निर्देश- अग्रवाल. >> करोनाच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर टास्क फोर्सची निर्मिती- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांची माहिती. >> कर्नाटकात रुग्णांची संख्या ६२ वर पोहोचली. >> करोना- उत्तर प्रदेशातील कॅबिनेट मंत्री बृजेश पाठक यांनी घरातच सुरू केले लोकांच्या मदतीसीठी कंट्रोल रूम. >> उत्तरांखंडमध्ये विवाहसोहळ्याला गर्दी करणाऱ्या ८ लोकांना अटक, परवानगी न घेतात आयोजित केला होता कार्यक्रम. >> करोना: दिल्लीतील जामा मशिदीत होणार नाही नमाज. >> मुस्लिम नागरिकांनी मशिदीत जमा होऊ नये- मौलाना अरशद मदनी यांचे आवाहन. >> उद्यापासून दिल्लीत ४ लाख लोकांना जेवण दिले जाणार- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. >> आज आम्ही २ लाख लोकांना जेवण देणार- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. >> कर्नाटकात एकाचा करोनामुळे मृत्यू, कर्नाटकात मृतांची संख्या ३ >> दिल्लीत करोनाग्रस्तांची संख्या ३९ वर- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची माहिती. >> राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी करोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यांमधील राज्यपालांशी केली चर्चा. >> (सविस्तर बातमी वाचण्यासाठी करा क्लिक) >> पश्चिम बंगाल: कोलकात्यातील रस्त्यांवर लॉकडाऊनच्या तिसऱ्या दिवशी असा शुकशुकाट आहे. >> दिल्लीत आतापर्यंत ३६ जणांना करोनाची लागण, एक मृत्यू >> पंजाबमधील पोलिस कर्मचारी लोकांना गमतीशीर पद्धतीने आवाहन करताना... >> भारतात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७०० वर, तर आतापर्यंत २० जणांचा मृत्यू >> महाराष्ट्रात धान्याची दुकाने २४ तास खुली राहणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय. >> दिल्लीत एकूण ९०० जणांना क्वारंटाइन केले जाणार. >> करोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. >> काल २४ तासांमध्ये आढळले एकूण ४२ रुग्ण >> देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ६९४ वर पोहोचली आहे.
Viewing all 172706 articles
Browse latest View live




Latest Images