Quantcast
Channel: Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 173382

हार्बरवर ७२ तासांचा विशेष जोड ब्लॉक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाड्या चालवण्याच्या हेतूने सुरू असलेल्या विस्तारीकरणाचा भाग म्हणून १२ ते १४ फेब्रुवारीपर्यंत ७२ तासांचा ब्लॉक चालणार आहे. हार्बरवर अजूनही तांत्रिक अडचणींमुळे १२ डब्यांच्या लोकल चालवल्या जात नाहीत. या दृष्टीने हार्बरवर ३ ते ११ फेब्रुवारीच्या रात्रीच्या ब्लॉकला जोडून हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे.

रेल्वे अर्थसंकल्पानंतर १२ डब्यांची योजना प्रत्यक्षात येण्यासाठी ७२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बरवर वार्षिक १० टक्क्यांची वाढ लक्षात घेता या सेवेवर सुधारणा करण्यास प्राधान्य देण्यात आला. त्यातूनच, सीएसटी ते मानखुर्दपर्यंत प्लॅटफॉर्म विस्तारीकरण हाती घेण्यात आले. त्यापाठोपाठ 'डीसी-एसी' विद्युतप्रवाह परिवर्तनापासून अन्य कामे शिल्लक राहणार आहेत. ही कामे येत्या एक ते दोन महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी १२ ते १४ फेब्रुवारीपर्यंत ब्लॉक घेत महत्त्वाची कामे हाती घेतली जाणार आहे. या काळात सर्व गाड्या सीएसटीऐवजी वडाळ्यापर्यंत चालवल्या जाणार आहे. या कालावधीत १३ फेब्रुवारीला दुसरा शनिवार असल्याने लोकलमध्ये तुलनेने कमी गर्दी असेल, असा अंदाज मांडला जात आहे. तर, रविवारची सुट्टी असल्याने गर्दीचा ताण येणार नाही, असा होरा आहे.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 173382

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>