वृत्तसंस्था, कोलकता
सॉल्ट लेकच्या सेक्टर पाचमध्ये धावत्या गाडीत तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. पोलसिांना ही तरुणी सॉल्ट लेकच्या सेक्टर एकमध्ये बेशुद्धावस्थेत सापडली. या घटनेमुळे २०१२मध्ये पार्क स्ट्रीटवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या आठवणी ताज्या झाल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी एका हॉटेलमध्ये काम करते. न्यू टाऊनजवळ वाहनाची वाट पाहत असताना आरोपींनी दिलेली लिफ्ट स्वीकारून ती गाडीत बसली. मात्र चालकाने गाडी निर्जन मार्गावर वळवली आणि गाडीतील चार-पाचजणांनी तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, गोव्यातही एका महलिेवर दोन नायजेरियन तरुणांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट